पणजी- उत्तर गोव्यातील शिरसोडा येथे एक पुर्ण वाढ झालेला बिबट्या विहिरीत पडला. वाळपई येथील वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने बिबट्याला बाहेर काढले. त्याला आता सुरक्षित अधिवासात सोडले जाणार आहे. दरम्यान,या प्रकारामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
शिरसोडा हे गाव म्हादई अभयारण्य परिसरात येते. याठिकाणी बऱ्याचदा वन्य प्राणी गावात येण्याचे प्रकार घडत असतात. हा बिबट्या देखील गुरूवारी रात्री गावातील विहिरीत पडला होता.आज शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली.त्यांनी वनविभागाला ही माहिती कळवली.त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी या बिबट्याला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले.त्याला पिंजऱ्यात ठेवले आहे.या बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाईल.