मापुसा-
गोव्यातील सर्वात वयस्कर मॅटिल्डा डिसूझा यांचे वयाच्या १११ व्या वर्षी खासगी रुग्णालयात निधन झाले. मॅटी या टोपणनावाने ओळखल्या जाणार्या मॅटिल्डा यांचा जन्म पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या तीन वर्षे आधी २५ ऑक्टोबर १९११ रोजी झाला होता.
गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांच्यावर आधी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आणि नंतर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले होते.
गोव्यातील सर्वात वयस्कर महिलेचे १११ व्या वर्षी निधन
