गोव्यात आज आणि उद्या पावसाचा ‘यलो अलर्ट जारी

पणजी- गोव्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला असून कधी उघडीप तर कधी मुसळधार पाऊस कोसळत आहे.गोवा हवामान खात्याने राज्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून उद्या मंगळवार १८ आणि बुधवार १९ जून या दोन दिवासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या चोवीस तासांत पणजीत सर्वाधिक ६७.४ मिमी,मुरगाव ५२.६ मिमी, मडगाव ४२ मिमी , दाबोळी ३९.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गेल्या काही दिवसांत गोव्याच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: सखल भागात मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत.भारतीय हवामान विभागाचे गोवा प्रभारी राहुल यांनी सांगितले की,कर्नाटकातून जाणाऱ्या खालच्या पातळीत ढगांची उपस्थिती आणि गोव्याच्या दक्षिणेकडील परिसंचरणामुळे मध्यम उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये ओलावा येण्याची शक्यता असल्याने २४ तासांत ७-१ सेमी मुसळधार पाऊस पडेल.मच्छिमारांना आज आणि उद्या केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी आणि १९ मे रोजी गोवा-दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीच्या प्रदेशात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.नैऋत्य मान्सून अंदमान समुद्रात त्याच्या सामान्य वेळापत्रकापेक्षा सहा दिवस अगोदर पोहोचला आहे आणि दोन दिवसांत तो पुढे जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top