गोव्यात पाळीव कुत्र्यांसाठी ५०० रुपये कर आकारणार

पणजी- गोवा राज्यातील म्हापसा नगरपरिषदेने नवीन आर्थिक वर्षापासून घर करात तब्बल ११० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावासह विविध सेवांसाठी कर आणि शुल्कात वाढ सुचविल्याने म्हापसातील रहिवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.फक्त एवढेच नव्हे तर आता घरात असलेल्या पाळीव कुत्र्यासाठीही कर भरावा लागणार आहे.
घरातील प्रत्येक कुत्र्यामागे मालकाला ५०० रुपये कर लावण्याचाही प्रस्ताव नगरपरिषदेतर्फे देण्यात आला आहे.

तसेच पाणी आणि वीज कनेक्शनसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरी संस्थेने शुल्कात ४०० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापार परवाना,घर दुरुस्ती परवाना, हस्तांतरण शुल्क इत्यादींसह इतर विविध कर वाढवण्याची योजना देखील प्रस्तावित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे व्यावसायिक प्रकल्पांसाठी बांधकाम परवाना शुल्क १.५ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांपर्यंत म्हणजे ८० टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. शुल्कात वाढ करून जमा होणारा अतिरिक्त निधी पालिका कर्मचार्‍यांच्या पगारासाठी आणि विकास कामे करण्यासाठी वापरण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.संदर्भात मुख्याधिकारी अमितेश शिरवोईकर यांनी प्रसारित केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, \”कचरा व्यवस्थापन,कर्मचार्‍यांचे पगार आणि इतर विकासकामांसाठी परिषदेला मोठ्या प्रमाणात महसुलाची गरज असल्याने नवीन दरांचा अवलंब करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येत आहेत.

Scroll to Top