गौतम अदानींनी ३४ हजार कोटींच्या
पेट्रोलियम कंपनीचे काम थांबवले

गांधीनगर- हिंडेनबर्गच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी समूहाला मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत आहे. मात्र त्यामुळे कंपनीचे शेअर्स आणि संपत्ती घटू लागली आहे.त्यातच आता अदानी समूहाने गुजरातमधील मुंद्रा येथे ३४,९०० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे काम थांबवले आहे.

अदानी समूह सध्या ऑपरेशन्स एकत्रित करण्यावर आणि गुंतवणूकदारांच्या चिंता दूर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.हिंडेनबर्ग रिसर्चच्या २४ जानेवारीच्या अहवालात अदानी समूहावर अकाउंटिंग फ्रॉड आणि स्टॉक मॅनिप्युलेशनसारखे गंभीर आरोप लावण्यात आले होते.यामुळे कंपनीचे सुमारे १४० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. बंदरापासून विमानतळापर्यंतच्या व्यवसायात गुंतलेली कंपनी आता गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.२०२१ मध्ये अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेड ही पूर्ण मालकीची उपकंपनी सुरू केली. गुजरातमधील कच्छमधील अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्राच्या जमिनीवर कोळसा ते पीव्हीसी प्लांट उभारण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली.

अदानी समुहाने फॉलबॅक धोरण म्हणून हजार कोटी रुपयांच्या कोळसा प्रकल्पाची देशांतर्गत उत्पादन जवळपास स्थिर असल्याने मागणीनुसार भारत आयातीवर अवलंबून आहे.गौतम अदानी यांना आता कर्जाचा बोजा कमी करायचा आहे.अदानी समूह आता यासाठी निधी उभारण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह निधी उभारण्यासाठी अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विकण्याच्या प्रक्रियेत आहे.अदानी समूहाने ज्या प्रकल्पांवर सध्या पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यात दरवर्षी दहा लाख टन ग्रीन पीव्हीसी प्रकल्पाचा समावेश आहे. अदानी समूहाने पुरवठादारांना सर्व कार्य त्वरित थांबवण्यासाठी मेल पाठवला आहे.मेलमध्ये, अदानी समूहाने मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेडच्या ग्रीन पीव्हीसी प्रकल्पाला पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व कार्य थांबवण्यास सांगितले आहे.
पीव्हीसी प्लास्टिक हे जगातील तिसरे सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादित सिंथेटिक पॉलिमर आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्लोअरिंगपासून, सीवेज पाईप्स आणि इतर पाईप ऍप्लिकेशन्स बनवण्यापासून इलेक्ट्रिकल केबल्सच्या इन्सुलेशनपर्यंत, पॅकेजिंग आणि ऍप्रन्सच्या निर्मितीमध्ये त्याचा वापर होत होता.भारतातील पीव्हीसीची मागणी सुमारे ३.५ एमटीपीए आहे, ती वर्षानुवर्षे सात टक्क्यांच्या दराने वाढत आहे.१.४ दशलक्ष टन पीव्हीसीचे देशांतर्गत उत्पादन जवळपास स्थिर असल्याने, मागणीनुसार भारत आयातीवर अवलंबून आहे.

Scroll to Top