गौतम अदानी आता भूतानमध्ये ग्रीन हायड्रो प्रकल्प उभारणार

थिम्फू
भूतानमध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ५७० मेगावॅटचा ग्रीन हायड्रो प्रकल्प उभारणार आहे. गौतम अदानी भूतानची राजधानी थिम्फू येथे जाऊन भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भूतानमध्ये ५७० मेगावॅटच्या ग्रीन हायड्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या शपथविधीला जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.
याबाबत गौतम अदानी यांनी सोशल मीडिया मीडियावर फोटोसह एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये गौतम अदानी यांनी सांगितले की, चुखा प्रांतातील ५७० मेगावॅटच्या ग्रीन हायड्रो प्रकल्प उभारण्यासाठी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत करार केला. भूतानचे पंतप्रधान महामहिम राजाचे व्हिजन पुढे नेत आहेत आणि संपूर्ण राज्यात पायाभूत सुविधांसाठी व्यापक उपक्रम हाती घेत आहेत, हे पाहून खूप आनंद झाला. भूतानमधील जलविद्युत आणि इतर पायाभूत सुविधांवर एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top