मुंबई- दोन महिन्यांपूर्वी पत्नीसह मुले सोडून गेल्याच्या मानसिक नैराश्यातून एका व्यक्तीने त्याच्याच शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ग्रँटरोड परिसरात घडली या हल्ल्यात जयेंद्रभाई मिस्त्री (77) आणि इलाबेन जयेंद्रभाई मिस्त्री (70) या वयोवृद्ध पती-पत्नीसह जेनिल ब्रम्हभट्ट (18) वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला तर स्नेहल ब्रम्हभट्ट आणि प्रकाश वाघमारे हे गंभीर जखमी झाले.
चाकू हल्ला करणारा चेतन गालाला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ग्रँटरोड येथील डी.बी मार्ग, पार्वती मेन्शन, सी ब्लॉक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चेतन राहतो. या इमारतीपासून काही अंतरावरील एका इमारतीमध्ये त्याची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा राहतात. दोन महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादातून त्याची पत्नी आणि मुले त्याला सोडून निघून गेले होते. पत्नी आणि मुले सोडून जाण्यामागे स्थानिक रहिवाशांचा सहभाग होता. त्यांच्यामुळेच ते त्यांना सोडून गेल्याचा चेतनचा समज होता.त्याला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. शुक्रवारी त्याची मुलगी त्याला जेवणाचा डब्बा घेऊन आली होती. जेवण दिल्यानंतर ती निघून गेली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता त्याने शेजारी राहणाऱ्या जयेंद्रभाई, त्यांची पत्नी इलाबाई यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्नेहल, तिची मुलगी जेनिल आणि प्रकाश वाघमारे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. स्नेहलची मुलगी घाबरुन खाली पळून गेल्याने ती हल्ल्यातून बचावली होती. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला.
ग्रँटरोडमध्ये चाकू हल्ल्यात