कोल्हापूर – कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील किणे गावात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. अर्जुन गुडूळकर असे या महिलेचे नाव आहे.
गुडूळकर कुटुंबीय हे येथील प्राथमिक शाळेसमोरील घरामध्ये राहते. दुर्घटनेमध्ये सुनीता अर्जुन गुडूळकर या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्यासोबत वत्सला परसू गुडुळकर यादेखील जखमी झाल्या.
घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
