नवी दिल्ली – भाजपच्या 44 स्थापना दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीतील भाजप मुख्य कार्यालयातून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसची संस्कृती आणि विचार लहान आहेत. छोटी स्वप्ने बघायची आणि त्याहून छोटे यश मिळवून आनंद साजरा करायचा ही काँग्रेसची संस्कृती आहे. वंशवाद आणि घराणेशाही हीच काँग्रेसची ओळख आहे. देशाचा विकास हा भाजपानेच केला असल्याचे मोदींनी ठामपणे सांगितले.
पुढे मोदी म्हणाले की, राक्षसांचा सामना करताना हनुमान कठोर झाले. अशाच प्रकारे भ्रष्टाचार, घराणेशाहीशी लढायचे असेल तर कठोर व्हावे लागणार आहे. भारताचे संरक्षण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हनुमानासारखे कठोर व्हावे लागते. देशाच्या नावावर राजकारण करणे ही भाजपची संस्कृती नाही. द्वेषाने पछाडलेले लोक आज वारंवार खोटे बोलत आहेत. हे लोक नैराश्याने ग्रासले आहेत. त्यामुळेच ते मोदी तुमची कबर खोदू असे म्हणत आहेत. दलित, आदिवासी, महिला, माता, तरुण आणि गरीब लोक भाजपच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. भाजपचे कमळ फुलवत आहेत, हे या लोकांना माहीत नाही.
घराणेशाही हीच काँग्रेसची ओळख