चंद्रपुरात रेल्वेच्या इंजिनवर
बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू !

नाशिक – बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. शहरीकरणामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत आढळून येत आहेत. मात्र अनेकदा हे या प्राण्यांच्या जीवावरच बेतताना दिसते चंद्रपुरात मालगाडीच्या इंजिनवर बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे.

घुग्घुस येथील न्यू रेल्वे कोल साइडिंग येथील ही घटना आहे.आज मंगळवारी सकाळी ही मालगाडी चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमधून या कोल सायडिंगमध्ये दाखल झाली.त्यावेळी इंजिनच्या वर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. त्यामुळे मालगाडीच्यावर चढलेल्या बिबट्याला हाईटेंशन इलेक्ट्रिक तारांचा स्पर्श झाला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.वनविभाग आणि रेल्वे प्रशासन या घटनेचा तपास करत आहेत.

Scroll to Top