चंद्रपूर – कॉंग्रेसचे नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर काल गुरुवारी रात्री गोळीबार करण्यात आला.सुदैवाने संतोष रावत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. गोळी त्यांच्या डाव्या हाताला लागून गेल्याने ते जखमी झाले आहेत.ही गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हल्लेखोरांनी गोळीबार करून गाडीतून पळ काढला.हल्लेखोर हे गोळीबार करण्यासाठी आधीच कारमध्ये दबा धरून बसले होते.या हल्ल्याप्रकरणी संतोष रावत यांनी मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असून हल्ला करत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.संतोष रावत हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुल शाखेतून स्कूटीवरून घरी जात होते. तेव्हा बँकेसमोर काही अंतरावर हल्लेखोर दबा धरून बसले होते. त्यातील बुरखाधारक व्यक्तीने संतोष रावत यांच्यावर गोळीबार केला.