चंद्रयान-३ मिशनचा महत्त्वाचा टप्पा पार

नवी दिल्ली –
चंद्रयान-३ मागील १५ दिवसांपासून पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत आहे. या यानासाठी आजची रात्र महत्त्वाची होता. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आज रात्री एक अवघड प्रयोग करणार होता. मध्यरात्री म्हणजे रात्री १२ ते एक च्या दरम्यान चंद्रयान ३ मधील इंजिन सुरू केले जाणार होते. ५ मिनीटांपेक्षा जास्त प्रज्वलित केले जाणार होते. त्यामुळे यान हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु करणार आहे. यामुळे यामुळे चांंद्रयानचा वेग हा १० किलोमीटर प्रति सेकंद एवढा होऊन चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचणार आहे. सध्या चंद्रयान हे २३६ किलोमीटर ते एक लाख २७ हजार ६०९ किलोमीटर या कक्षेत पृथ्वीला प्रदक्षणा घालत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top