चंबळ नदीत भाविक बुडाले! सात जण बेपत्ता

जयपूर- राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील सपोत्रा ​​भागात मोठी दुर्घटना घडली. मध्य प्रदेशातील काही भाविक कैलादेवीच्या दर्शनासाठी जाताना चंबळ नदी पार करतेवेळी नदीच्या प्रवाहात १७ भाविक वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. यावेळी १० जणांना वाचवण्यात आले. तर, उर्वरित ७ जणांना शोधण्याचे काम सुरु आहे.

मध्य प्रदेशच्या जरुर गावातून १७ भाविक जत्था कैलादेवीच्या दर्शनाला जात होते. यावेळी ते चंबळ नदी पार करून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात होते. या नदीला भरपूर पाणी असल्याने नदीत प्रवेश करताच भाविक पाण्यात बुडू लागले. एकमेकाला वाचवण्याच्या प्रयत्नात ते १७ जण नदीपात्रात वाहत गेले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज गावकऱ्यांनी ऐकला व त्यांनी घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरु केले.

Scroll to Top