मुंबई :
चक दे इंडिया, दिल चाहता है आणि हॅपी न्यू इयर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते रिओ कपाडिया यांचे आज दुपारच्या सुमारास निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. कपाडिया यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता गोरेगाव येथील शिवधाम स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कपाडिया यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप उमटवली होती. त्यांनी शाहरुख, आमिर खानच्या चित्रपटांमधून काम करत त्यांनी स्वत:ची ओळखही तयार केली होती.
याशिवाय विविध टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील मालिका आणि जाहिरातींमधून देखील त्यांनी भूमिका वठवली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची मेड इन हेवन २ नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. त्यात त्यांनी मृणाल ठाकूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. रिओ यांनी सपने सुहाने लडकपन के, कुटुंब, जुडवा राजा, क्यूँकी सास भी कभी बहू थी सारख्या मालिकांमधून त्यांनी काम केले होते. त्यांच्या जाण्याने टीव्ही मनोरंजन विश्व आणि चित्रपट विश्वाची मोठी हानी झाली असल्याच्या प्रतिक्रिया अनेक सेलिब्रेटींनी व्यक्त केल्या आहेत.