डेहराडून – एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे. गंगोत्री, यमोनत्रीचे दरवाजे २२ एप्रिल, केदरनाथचे २६ एप्रिल आणि बद्रिनाथचे दरवाजे २७एप्रिलला उघडण्यात येणर आहे. या पार्श्वभूमीवर तयारीच आढावा घेण्यासाठी आज गुरुवारी उत्तराखंडच्या सात जिल्ह्यात मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, डेहराडून, हरिद्वार, पौडी आणि तिहरी येथे मॉक ड्रिल होणार आहे. या मॉक ड्रिलमधये जिल्हा प्रशासन, आर्मी, एसएसबी, आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरपीएफ, वायूसेना यांच्यातील समन्वयाचा आढावा घेतला जाणार आहे. एनडीआरएफचे अधिकारीदेखील यावेळी उपस्थित राहतील. उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी अनिवार्य केली आहे. यात्रेच्या मार्गावर ५० हेल्थ एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी चार धाम यात्रेत प्रवाशांची रिस्ट बँड, फिजिकल आणि क्यूआर कोडसह तपासणी तीन पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे.
४ मेपासून मानसरोवरच्या यात्रेलाही प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी १०२ यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. कुमाऊ विकास मंडळाने या यात्रेची तयारी सुरू केली असून पाच सदस्यांच्या एका टीमने बूंदी, गुंजी, कालापानी आणि नाभीढांग येथे पाहणी केली. या यात्रेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे.