चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीचा गुन्हा

मुंबई- चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट आणि त्यांची मुलगी कृष्णा भट आता अडचणीत आले आहेत. या पितापुत्रीविरोधात हे के सेरा सेरा कंपनीचे मालक अमोल देशमुख यांनी फसवणुकीचा आरोप करत अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अमोल देशमुख यांनी भट यांच्यावर केलेल्या आरोपानुसार 1 मार्च 2022 पासून आतापर्यंत विक्रम आणि कृष्णा यांनी कट करून एकत्रितपणे देशमुख यांच्या कंपनीसोबत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर देशमुख यांची के सेरा सेरा अँड विक्रम भट स्टुडिओ व्हर्चुअल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बनवली. त्यानंतर कंपनीच्या बँक खात्यावर देशमुख यांना 1 कोटी 39 लाख 30 हजार 999 इतकी रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडत त्याचा वापर वैयक्तिकपणे चित्रपटांसाठी केला. या आर्थिक फसवणूकप्रकरणी विक्रम आणि कृष्णा यांच्या विरोधात देशमुख यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी याची पडताळणी करत दोघांवर 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top