चीनच्या प्रधानमंत्रीपदी ली कियांग यांची निवड

शंघाई- शी जिनपिंग हे चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसर्‍यांदा पुन्हा विराजमान झाल्यानंतर ली कियांग चीनचे प्रधानमंत्री बनले आहेत. कियांग हे शी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या द्वि-अधिवेशनात ली कियांग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने 10 वर्षांपासून क्रमांक 2 च्या खुर्चीवर असलेले ली केकियांग यांचा कार्यकाल संपुष्टात आला. यापूर्वी ली कियांग हे झेजियांगचे गव्हर्नर आणि शंघाईचे पार्टी प्रमुख राहिले असून प्रो बिजनेस राजनेता अशी ली यांची प्रतिमा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चिनी संसदेच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या बैठकीत त्यांना नवीन पंतप्रधान म्हणून नामांकित करण्यात आले.

Scroll to Top