चीनने बनवले पहिले स्वदेशीबनावटीचे प्रवासी विमान !

बीजिंग – चीनने आता आपले पहिले स्वदेशी बनावटीचे प्रवासी विमान बनवले आहे.’सी- ९१९” या चीनच्या पहिल्या व्यावसायिक,व्यापारी विमानाने काल रविवारी यशस्वीरित्या उड्डाण पूर्ण केले. या विमानाच्या या यशानंतर चीनने जागतिक विमान बाजारपेठेत आपली उपस्थिती नोंदवली आहे. आता अमेरिका,युरोपच्या विमाननिर्मिती क्षेत्राला चीन टक्कर देण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत बनवलेले प्रवासी विमान ‘सी- ९१९” ने शांघायच्या पूर्वेकडील महानगरातून बीजिंगला उड्डाण केले.हे पहिले व्यावसायिक विमान चायना इस्टर्न एअरलाइन्स कंपनीचे असून ते चीनच्या राज्य विमान वाहतूक एजन्सीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.चीनच्या जिनूव्हा या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या व्यावसायिक विमानात १२८ प्रवासी होते. तसेच शांघाय आणि बीजिंग दरम्यानच्या उड्डाणाची वेळ अंदाजे दोन तास पंचवीस मिनिटे होती. ट्विन-इंजिन विमानात १६४ जागा आहेत. रविवारी दुपारी १२.३१ वाजता बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर विमानाला पाण्याचे फवारे मारून वॉटर सॅल्युट देत त्याचे स्वागत करण्यात आले. या विमानाचा पल्ला ५५५ किलोमीटरचा असून हे विमान आता बोइंग आणि एअरबसशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top