बीजिंग- अमेरिकेत तीन वर्षांपूर्वी डुकराच्या किडनीचे माणसाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याचे यशस्वी संशोधन केले होते. मात्र आता चिनी शास्त्रज्ञांनी याच्या उलट संशोधन केले आहे.या शास्त्रज्ञांनी डुकराच्या शरीरात मानवीकृत मूत्रपिंड म्हणजे किडनी विकसित करण्यात यश मिळवले आहे. हे प्राथमिक स्वरूपातील संशोधन असले तरी भविष्यात मानवी अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात यातून मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ‘सेल स्टेमसेल’ नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
वास्तविक बाहेरील कोणतीही वस्तू हानिकारक समजून तिला विरोध करण्याची मानवी शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती असते. डुकराची किडनी मानवामध्ये प्रत्यारोपित करतानाही सुरुवातीला तशा अडचणी आल्या होत्या.त्यामुळे चिनी चिनी शास्त्रज्ञांनी डुकराच्या शरीरात मानवाची किडनी विकसित करण्याचा प्रयोग केला आहे.त्यामुळे डुकरामध्ये विकसित केलेली मानवी किडनी पुन्हा मानवी शरीरात सहजपणे स्विकारली जाऊ शकणार आहे.यापुर्वी उंदराच्या शरीरात मानवीकृत अवयव विकसित करण्याचा प्रयत्न झाला होता.त्यानंतर
शास्त्रज्ञांनी माणूस आणि डुक्कर यांच्या दोन्ही पेशी असलेल्या एकत्रित भ्रूणाची निर्मिती केली आणि त्याला चिमेरा पेशी असे नाव दिले. या पेशींपासून बनलेले भ्रूण डुकराच्या शरीरात वाढविले असता त्याला मात्र कोणताही विरोध दिसला नाही.त्यामुळे असे अवयव मानवी शरीरात प्रत्यारोपित होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच यातून आवश्यक अवयव अन्य प्राण्यांच्या शरीरात विकसित करून ते मानवी शरीरात प्रत्यारोपित करून अनेकांना जीवदान देता येऊ शकणार आहे.
चीनमध्ये डुकराच्या शरीरात माणसाच्या किडनीची वाढ!
