बीजिंग
नैऋत्य चीनमधील मुस्लिमबहुल शहरात चिनी पोलिस आणि लोकांमध्ये संघर्ष झाला. आंदोलकांनी पोलिसांना शतकानुशतके जुन्या नजियायिंग मशिदीचे छत पाडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंसाचार सुरू झाला. केवळ चिनी अल्पसंख्याक समुदायाने मशीद पाडल्याचा निषेध केला. पोलिसांनी या भागातून माघार घेतल्याने, आंदोलकांनी गेटबाहेर रात्रभर ठिय्या मांडला होता. यावेळी सशस्त्र पोलिसांचे अनेक अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
ही घटना २०२० न्यायालयाच्या निर्णयाशी संबंधित होती. या निर्णयात म्हटले होते की, जी बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, त्या बेकायदेशीर बांधकामांपैकी ही मशीद एक आहे . तोंघाई काउंटी पोलिसांनी सांगितल्यानुसार, २८ मे रोजी घडलेल्या घटनेपासून चीन सरकार कारवाई करत आहे. शिवाय, सरकारकडून असा आदेश आहे की या आंदोलनात सहभागी असलेल्यांनी ६ जूनपूर्वी स्वत: ला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आत्मसमर्पण करावे जेणेकरून त्यांना कमी शिक्षा मिळू शकेल. दरम्यान, १३व्या शतकातील नजियायिंग मशिदीच्या इमारती पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत, ज्यात चार मिनार आणि एक व्हॉल्टेड छताचा समावेश आहे. दुसरीकडे चीनची ही मनमानी वृत्ती पाहून त्याचे परम मित्र पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांचेही त्याविरोधात काही म्हणणे नाही.