चॉकलेटचे आमिष दाखवून नागपुरात चिमुकलीवर अत्याचार

नागपूर- नागपूर येथील कामठी भागात ५० वर्षीय आरोपीने शेजारी राहणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्याने मुलीला चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी ही घाबरून घरी पळाली. यानंतर मुलीने हा प्रसंग आईला सांगितला. पिडीतेच्या आईने तातडीने मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. ही घटना मंगळवार १९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच बदलापूर, पुण्यापाठोपाठ आता नागपूर मध्येही लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.