कॅनबेरा : छत्तीसगडचे आरोग्य मंत्री आणि अंबिकापूरचे आमदार टीएस सिंहदेव हे सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते स्कायडायव्हिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ स्वतः टीएस सिंहदेव यांनी शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर स्कायडायव्हिंग करण्याची संधी मिळाली. हा एक विलक्षण अनुभव असल्याचे ट्विट टीएस सिंहदेव यांनी केले आहे. या व्हिडिओमध्ये टीएस सिंहदेव हजारो फूट उंचीवरून उडी मारल्यानंतर गाईडसोबत खाली येताना दिसतात. ते स्कायडायव्हिंगचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत असल्याचे पहायला मिळाले. टीएस सिंह यांचे हे साहस पाहून सीएम बघेल यांनीही त्यांच्यासाठी एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी “वाह महाराज साहेब! तुम्ही तर कमाल केलीत! तुमचा आत्मविश्वास असाच कायम ठेवा, असे ट्विट करत, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
टीएस सिंगदेव हे हेल्थ सिस्टिम्सचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील अनेक वरिष्ठ आरोग्य अधिकारीही यावेळी ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. येथे ते आरोग्य सेवेशी संबंधित ऑस्ट्रेलियन अधिकारी आणि योजनेशी संबंधित लोकांना भेटणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य तज्ज्ञांशीही चर्चा करणार आहे.