छातीत दुखू लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर रुग्णालयात

पुणे – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखायला लागल्याने त्यांना त्पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी करणार येणार आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील ३ ते ४ दिवस ते रुग्णालयात उपचार घेणार आहेत.आज याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीने ‘एक्स’वर पोस्ट करुन दिली. या पोस्टमध्ये म्हटले की, “बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”. त्यासोबत कोणत्याही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन समिती पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.