मुरूड –
पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने मुरुड येथील जंजिरा जलदुर्ग शुक्रवारपासून पर्यटनासाठी बंद करण्यात आला. हा जलदुर्ग मुरूडजवळील राजपुरी येथे आहे. याबाबत मुरूड येथील पुरातत्व खात्याचे अलिबाग-मुरूडचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या टाळण्यासाठी पुरातत्त्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी हा जलदुर्ग पर्यटनासाठी बंद ठेवते. यातून कुणाचाही आनंद हिरावून घेण्याचा अथवा कुणाचेही नुकसान करण्याचा हेतू नाही, अशी माहिती येलीकर यांनी दिली.