जपानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के

टोकिओ –

उत्तर जपानच्या इवाते आणि आओमोरी प्रांतात आज भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तर किनारपट्टी भाग होता. या भूकंपात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपानंतर हवामान खात्याने त्सुनामीबाबत कोणताही इशारा दिलेला नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपात ५० हून अधिक लोकांची मृत्यू झाला होता. तसेच इमारती, वाहने यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जपानमध्ये सततच्या होणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top