टोक्यो – जपानमध्ये आज भूकंपाचे तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.१ इतकी नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.जपानचा मियाझाकी परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. जपानच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिणेकडील मुख्य बेटाच्या क्युशूच्या पूर्व किनारपट्टीवर सुमारे ३० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर मालमत्तेच्या नुकसानीसह जीवितहानी झालेली नाही.दरम्यान, जपानच्या किनारीपट्टीवरील मियाझाकी, कोची, इहिमे, कागोशिमा आणि आहता या भागांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.