जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच जागतिक चित्रपट महोत्सव

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच जागतिक चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशाच्या विविध भागातून तब्बल ६० चित्रपट प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच या महोत्सवात भारतातील तसेच परदेशातील ६० हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. काश्मीर जागतिक चित्रपट महोत्सवाचे संचालक मुश्ताक अली अहमद खान यांनी सांगितले की, काश्मीर विश्व चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत तारखांची घोषणा केली जाईल.

मुश्ताक अली अहमद खान यांनी राजभवन येथे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि आगामी काश्मीर जागतिक चित्रपट महोत्सवाच्या तयारीबाबत त्यांना माहिती दिली. या महोत्सवात ६० हून अधिक प्रतिनिधींच्या सहभागासह महोत्सवाच्या ५ दिवसांमध्ये ६० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील. चित्रपट महोत्सवाचे तात्पुरते वेळापत्रक चित्रपट प्रतिनिधींना कळविण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या चित्रपट उद्योगासाठी हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. कारण चित्रपट उद्योगाला चालना मिळेल. ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top