मुंबई – अंधेरीतील वर्सोवा परिसरात यारी रोडवर असलेल्या एका सात मजली इमारतीच्या दुसर्या माळ्याची बाल्कनी कोसळल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींना पालिकेच्या कूपर हॉस्पिटलसह अंजुमन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कूपरच्या डॉक्टरांनी दिली.जखमींपैकी नंदिनी सरवदे (१६), दिवांजली आरोळे (१६), आणि सोफिया खान यांना कूपरमध्ये तर सौकत अन्सारी (२३) आणि अमन शाहू (१६) यांना सोफिया रुग्णालयात दाखल केले आहे.यारी रोडवर सिल्व्हर स्ट्रीक अपार्टमेंट नावाची ही सात मजली इमारत आहे. या इमारतीजवळ बांधकाम सुरू आहे.इमारतीच्या बांधकामाने मोठमोठे आघात होऊन कंपने निर्माण होत आहेत.त्यामुळे बांधकामातून झालेल्या कंपनामुळे इमारतीची बाल्कनी खाली पडली.या अपघातात ५ नागरिक ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाले.