श्रीनगर –
जम्मू -काश्मीरमध्ये बुधवारी दुपारपासून पावसाने सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून जम्मू -काश्मीरमध्ये ४ मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये ७.० डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, पहलगाम, कोकरणगमध्ये ५.२ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्यामुळे काश्मीरमधील हवामान पुन्हा एकदा बदलले आहे. बनिहालजवळील शालागादीमध्ये भूस्खलन आणि दरड कोसळल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. बुधवारी कथुआतील बिलावरच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस झाल्याने बर्याच ठिकाणी पीकांचे नुकसान झाले आहे. मेंडहार भागात वृक्ष पडल्यामुळे घराचे नुकसान झाले.
जम्मू- काश्मीरमध्ये ४ मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
