जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा द्या, निवडणूक घ्या

नवी दिल्ली :- जम्मू काश्मीरमधील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा तसेच लवकरात लवकर येथे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. हीच मागणी घेऊन जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षाचे नेते दिल्लीमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. यासह जम्मू काश्मीरमधील विविध पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाचीही भेट घेणार आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील १३ सदस्यीय शिष्टमंडळ दिल्लीत पोहचले आहे.

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला लवकरात लवकर राज्याचा दर्जा द्यावा. लवकरात लवकर येथे निवडणुका घ्याव्यात, या मागणीवर सर्वांचे एकमत झाले आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील १३ सदस्यीय शिष्टमंडळात खासदार एनसी हसनैन मसूदी, रतन लाल गुप्ता (नॅ.काँ.),रवींद्र शर्मा (काँग्रेस), हर्षदेव सिंग (पँथर्स पार्टी), मुझफ्फर शाह (एएनसी), अमर सिंग रीम (पीडीपी) यांचा समावेश आहे. मास्टर हरी सिंग (सीपीआय-एम), गुलचैन सिंग (डोगरा सदर सभा), मनेश सनैनी (शिवसेना), तरनजीत सिंग टोनी (आप) यांनी सहभाग घेतला.

Scroll to Top