बर्लिन
मॉस्कोने रशियातील जर्मन अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित केल्यानंतर जर्मन सरकार देशातील पाचपैकी चार रशियन वाणिज्य दूतावास बंद करणार आहे. जर्मन फेडरल फॉरेन कार्यालयाने ही माहिती दिली. मात्र बर्लिनमधील रशियन दूतावास, तसेच वाणिज्य दूतावास कार्यरत राहतील. हे नियम डिसेंबरपासून लागू होतील, असे कार्यालयाने सांगितले.
रशियामधील तीन वाणिज्य दूतावास बंद करत असल्याचे जर्मनीच्या परराष्ट्र कार्यालयाने देखील जाहीर केले. आम्ही रशियामधील जर्मन राजदूत गिझा अँड्रियास वॉन गेयर यांना सूचित केले आहे की, जर्मनीच्या प्रतिकूल कृतींना प्रतिसाद म्हणून रशियामधील जर्मन राजनैतिक कर्मचार्यांची संख्या मर्यादित असेल, असे २२ एप्रिल रोजी, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. जर्मनी आणि रशियाने वारंवार एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. मात्र, युक्रेनमध्ये संकट सुरू झाल्यापासून, परिस्थिती बिघडली आहे, ज्यामुळे युरोपियन युनियनने रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत.