येरवडा
येरवडा येथील जिल्हा क्रीडासंकुलाच्या परिसरातील जलतरण तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. शिरीष पंडित सुतार(३७) असे या तरुणाचे नाव असून तो धानोरी येथील रहिवासी होता. जलतरण तलावात पोहण्यासाठी शिरीष दुपारी ३ च्या सुमारास आपल्या कुटुंबासोबत गेला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी, मुले, भाऊ होते.
शिरीष पाण्यात उतरल्यानंतर काही वेळातच अचानक बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी त्याला तलावातून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.