जळगावहून लवकरच विमानसेवा सुरू होणार

जळगाव –

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत जळगावहून पुणे, गोवा, आणि हैदराबाद येथे विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी विमानतळावरील सुविधांसह विमानसेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता. ‘फ्लाय-९१’ ही नव्यानेच सुरू झालेली विमानसेवा कंपनी जळगावातून सेवा देण्यास उत्सुक असून, त्याबाबत कंपनीने सर्वेक्षणही करण्यात आले आहे.
याआधीही उडान योजनेंतर्गत जळगावहून मुंबई व अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू करण्यात आली होती. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ही सेवा बंद पडली. नंतरच्या काळात वारंवार प्रयत्न करूनही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे ती पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. ही विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात ‘फ्लाय-९१’ या कंपनीने सर्वेक्षण केले. त्यानंतर अभ्यास करून त्यासंबंधी प्रस्ताव सादर केला. उन्मेष पाटलांनी विमान प्राधिकरणासह विमान उड्डाण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. यानंतर लवकरच विमानसेवा सुरू होणार, अशी घोषणा करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top