जळगावातील वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे दर्शन

जळगाव – वनविभागातर्फे जिल्ह्यातील यावल अभयारण्यासह मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प आणि इतर ठिकाणी प्राणिगणना करण्यात आली. यामध्ये १३८ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. या गणनेत पट्टेदार वाघ, तरस, अस्वल, रानडुक्कर, रानससे, नीलगाई, लोधडी, चितळ, रानगवा, माकडे, हरीण, चिंकारा असे अनेक प्राणी आढळून आले.
मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प व यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे असलेल्या भागात मचाणी उभारून रात्रभर चंद्राच्या उजेडात प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. यावेळी मुक्ताई व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघाचे तर यावल अभयारण्यात बिबट्याचे दर्शन झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वनरक्षक यांनी प्राणिगणनेचे काम केले. मराज पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे संकेत पाटील, अंकित पाटील, (रावेर), डॉ. अविनाश गवळी (भुसावळ), पराग चौधरी, मनीष चव्हाण (पाल), कल्पेश खत्री (फैजपूर), लंगडा आंबा वनपाल समाधान करंज, वनरक्षक अब्दुल तडवी, जामन्या वनपाल पाटील, वनरक्षक अजय चौधरी, वन्यजीवचे वनपाल संभाजी सूर्यवंशी यांनी प्राणिगणनेत सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top