जळगाव जिल्‍हा परिषदेचा
३३ कोटींचा शिलकी अर्थसंकल्‍प

जळगाव – जिल्हा परिषदेचा २०२३-२४ चा ३० कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी मंजूर केला.यंदाचा ३३ कोटी ८० लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्‍पास मंजुरी दिली आहे.यात एकूण अर्थसंकल्‍पाच्‍या ३३ टक्‍के तरतूद पंचायतराज कार्यक्रमासाठी केली आहे. शिवाय समाजल्‍याण, शिक्षणासाठीही भरीव तरतूद केली आहे.
जिल्‍हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ मागील वर्षी २० मार्चला संपला.यामुळे सीईओंकडे मीनी मंत्रालयात प्रशासक म्‍हणून सीईओ डॉ. पंकज आशिया यांच्‍याकडे कारभाराची सर्व सूत्रे आहेत. अर्थसंकल्प अर्थ, वित्त लेखा विभागाने सादर केल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली. काल बुधवारी यासंदर्भात बैठक झाली.मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी बाबूलाल पाटील उपस्थित होते.जिल्‍हा परिषदेची सदस्‍य निवड प्रक्रिया होऊन पुढील वर्षी बॉडी स्‍थापन होईल.त्‍या अनुषंगाने २०२३-२४ साठी पंचायतराज कार्यक्रमासाठी सर्वाधिक तरतूद आहे. मागील वर्षी २ कोटी ७ लाख ६२ हजार रुपयांची तरतूद होती. यात ४ लाखांनी वाढ करून ६ कोटी १७ लाख २१ हजार इतकी वाढीव तरतूद केली आहे. यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात समाजकल्‍याणसाठी २ कोटी ९१ लाख ८० हजार रुपयांची तरतूद आहे.याच विभागातंर्गत दिव्‍यांगासाठी १ कोटी २२ लाख रुपयांची तरतूद आहे.

Scroll to Top