जी -७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींचा इटली दौरा

नवी दिल्ली – उद्यापासून इटलीत सुरु होणाऱ्या जी -७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना झाले . त्यांच्यासोबत परराष्ट्रमंत्री जयशंकर, परराष्ट्र सचिव विजय क्वात्रा आणि शिष्टमंडळ आहे .
इटलीमध्ये १३ ते १५ जून या कालावधीत ५० वी जी ७ शिखर परिषद होणार आहे. भारताला या परिषदेसाठी विशेष आमंत्रण देणेयात आले आहे . या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आदी महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. या शिखर परिषदेमध्ये जलवायू परिवर्तन , उर्जा, कृत्रिम बुध्दीमत्ता आदि विषयांवर चर्चा होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध आणि त्याचे जागतिक व्यापार उद्योगावर होणारे परिणाम यावरही चर्चा होणार आहे. यजमान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत भारत इटली व्यापार , उद्योग, तंत्रज्ञान यावर चर्चा होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top