जुन्नरमध्ये ट्रकच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

पुणे- गावातील व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यानंतर परतत असताना भरधाव ट्रकने चिरडल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण- नगर महामार्गावर घडली.जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडीत ग्रामस्थ अंत्यविधी आटपून परतत होते. त्यावेळी ग्रामस्थांना भरधाव ट्रकने चिरडले. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. ८ जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी कल्याण- नगर महामार्गावर रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. तवाणाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले.