नवी दिल्ली- भारतीय अंतराळ संशोधन संस्था जुलै महिन्यात भारताच्या तिसऱ्या चांद्र मोहिमेला सुरुवात करण्याची योजना आखत आहे. याबाबत माहिती देताना इस्रोच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, याच महिन्यात इस्रो आपले पहिले सूर्य मिशनही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, आदित्य-एल १ ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे. अंतराळ संस्था चांद्रयान-३ जुलैमध्ये या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर आदित्य-एल-१ देखील लॉन्च होणार असल्याची माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच सध्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या जात असून,ठरल्याप्रमाणे सर्व चाचण्या पार करून यशस्वी उड्डाण करण्यासाठी सज्ज होऊ, असा विश्वासही अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जुलैमध्ये इस्रोच्या तिसऱ्या चांद्रयान मोहिमेला सुरुवात
