जेवणात आढळले मानवी नख ‘वंदे भारत’च्या कंत्राटदाराला दंड

मुंबई – भारतातील सर्वाधिक वेगवान आणि आरामदायी असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात मानवी नख आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये घडला. प्रवाशाने या प्रकाराची तक्रार केल्यावर भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या प्रकारानंतर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये पुरवठा केल्या जाणार्‍या जेवणावर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसेच आता या गाडीत अन्नपुरवठा करणाऱ्या रत्नागिरीचे किचनचे परीक्षण केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र,या गाडीत मिळणाऱ्या सुविधेबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात चक्क मानवी नख सापडले. तसेच आणखी एका प्रवाशाला निकृष्ट दर्जाची डाळ दिली होती. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाकीटबंद जेवण दिले जाते. यात हे नख सापडले. संबधित प्रवाशाने याचा व्हिडिओ बनवत तो सोशल मिडियावर ट्विट केला आहे. त्याने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळणार्‍या खराब सेवा आणि जेवणाच्या दर्जाबाबतदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top