तिबिलीसी
जॉर्जियाच्या ब्रन्सविस येथील पिनोव्हा कारखान्याला भीषण आग आगल्याची घटना काल सकाळी घडली. या आगीनंतर कारखान्याचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर निरमनुष्य करण्यात आला होता. या आगीतून प्रचंड धुराचे लोट सर्वत्र पसरले होते.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यामुळे स्थानिक प्रशासन सर्तक झाले होते. जिवितहानी टाळण्यासाठी कारखान्याचा आजूबाजूचा परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी 10.30 वाजता ही आग विझवली. या कारखान्यातून काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र त्यानंतर या कारखान्यात दुपारी 3.30 वाजता आग लागली. त्यामुळे तेथे पुन्हा धावपळ उडाली. जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग विझवली. या आगीत कोणात्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले.