मुंबई – हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांमधील जेष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. कुमकुम भाग्य या मालिकेतील आजीच्या भूमिकेने त्या घराघरात पोहोचल्या होत्या. बुनियाद, नुक्कड, एक और महाभारत सारख्या अनेक महत्त्वाच्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.आशा शर्मा यांनी ऐंशीच्या दशकात अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. दो दिशाए, मुझे कुछ कहना है, प्यार तो होना ही था अशा अनेक सिनेमात त्यांनी भूमिका केल्या. प्रभासची भूमिका असलेल्या आदिपुरुष चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. मन की आवाज प्रतिज्ञा, कुमकुम भाग्य या मालिकेतही त्यांनी भूमिका केल्या.
