नवी दिल्ली : व्हिडिओ कम्युनिकेशन कंपनी झूमचे सीईओ एरिक युआन यांनी कंपनीच्या १,३०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केल्यांनतर आता, कंपनीचे अध्यक्ष, ग्रेग टॉम्ब यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे. नियामक फाइलिंगमध्ये, झूमचे अध्यक्ष ग्रेग टॉम्ब यांना नोकरीवरून काढून टाकण्याचे कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.
ग्रेग टॉम्ब ऑगस्ट २०१९ मध्ये कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी म्हणून झूममध्ये सामील झाले आणि फक्त आठ महिन्यांनंतर त्यांची अध्यक्षपदी पदोन्नती झाली. जून २०२२ मध्ये ग्रेग टॉम्ब यांनी एक्झिक्युटिव्ह म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांना काढून टाकण्यात आले आहे. अद्याप टॉम्ब यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यामागचे कारण देखील कंपनीने स्पष्ट केलेले नाही.