झोका खेळताना नऊ
वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

सातारा: खटाव तालुक्यातील तडवळे गावात नऊ वर्षाच्या मुलीचा झोका खेळताना फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.लोखंडी पाईपला साडी बांधून एक चिमुकली झोका खेळत होती. अचानक तिची त्यात मान अडकली आणि फास लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाला.या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पौर्णिमा शंकर फाळके (वय ९ वर्ष) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिने घरातील लोखंडी पाईपला साडी बांधली होती. या साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती. त्याचवेळी खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकली. काही कळण्याच्या आतच तिला फास बसला. आरडाओरड केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला.त्यांनी तातडीने पौर्णिमाकडे धाव घेतली. कुटुंबियांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज (ता. खटाव) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Scroll to Top