टाटा कंपनीची विनंती मान्य मुंबईत वीज दरवाढीला स्थगिती

मुंबई – महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मान्यता दिलेल्या एमटीआर फ्रेमवर्कवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या सुधारित प्रस्तावित वीज दरवाढीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी टाटा पॉवरने केलेली विनंती अपीलेट ट्रायब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीने एका आदेशाद्वारे मान्य केली आहे. या स्थगिती आदेशामुळे मुंबईतील तब्बल साडेसात लाख ग्राहकांना वीज दरवाढीपासुन तूर्तास दिलासा मिळाला आहे. दरम्यान,आता आम्हाला आमच्या ग्राहकांना सर्वात कमी दरात वीज देता येईल, असा दावा टाटा इलेक्ट्रिसिटीने केला आहे.

टाटा पॉवरने एपीटीईएलकडे एमईआरसीने ३० मार्च २०२३ रोजी जारी केलेल्या अंतरिम वीजदर आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली होती. कारण या वीजदरामुळे २०२३-२४ सालासाठी वीज १० टक्क्यांनी महागली होती, तर त्यापुढील वर्षांसाठीही ती २१ टक्क्यांनी महागणार होती. याबाबत शुक्रवारी सुनावणी पार पडली. यामध्ये टाटा कंपनीची विनंती मान्य करण्यात आली असल्याची माहिती टाटा कंपनीने दिली.

टाटा पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनचे अध्यक्ष संजय बांगा यांनी सांगितले की, ‘पर्यावरणपूरक वीज स्वस्त दरांमध्ये पुरवण्याची आमची बांधिलकी यामुळे सिद्ध झाली आहे. या निर्णयाचे थेट लाभ आमच्या ग्राहकांना मिळणार आहेत’.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top