\’टाटा\’ बिसलेरी घेणार नाही !
कराराची बोलणी फिस्कटली

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या मिनरल वॉटरच्या कराराला मोठा झटका बसला आहे. हा खरेदीविक्री व्यवहार
टाटा समूह आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्यात होणार होता.पण आता ही व्यवहाराची चर्चा बंद झाली आहे. आता टाटा कंपनी बिसलेरी खरेदी करणार नाही.तसे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टने शेअर बाजाराला तसे सूचित केले आहे.
देशातील सर्वात मोठी बाटलीबंद पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी खरेदीसाठी टाटा समूहाने आघाडी घेतली होती. या दोन्ही समूहात बोलणी अंतिम टप्प्यात पोहचली होती. ६ ते ७ हजार कोटींमध्ये हा व्यवहार होणार असल्याचे बोलले जात होते. पण या कराराला खोडा बसला आहे.बिसलेरी आणि टाटातील बोलणी फिस्कटली आहे. हा करार अंतिम टप्प्यात असताना कंपनीच्या मूल्यांकनावरुन वाद पेटला.
बिसलेरी कंपनीला या डीलमधून घसघशीत रक्कम मिळण्याची अपेक्षा होता. पण टाटा समूह बिसलेरीसाठी एवढी रक्कम मोजायला तयार नसल्याचे समजते.बिसलरीचा बाजारात ३२ टक्के हिस्सा असून ही कंपनी २० हजार कोटींचा पाणी व्यावसाय करत पहिल्या क्रमांकावर आहे.
बिसलेरीचे रमेश चौहान हे सध्या ८२ वर्षांचे असून त्यांनी १९६९ साली एका इटलीच्या उद्योजकाकडून अवघ्या ४ लाखांत बिसलेरी कंपनी खरेदी केली होती. सध्या या कंपनीचे देशभरात १२८ हून अधिक प्लांट आहेत. तर कंपनीचे ६ हजार पेक्षा जास्त वितरक आहेत.

Scroll to Top