मुंबई
टाटा समूहाच्या घड्याळे व फॅशन ॲक्सेसरीज विकणाऱ्या ‘टायटन’ ब्रँडने बोरिवली पश्चिमेला १०० कोटी रुपयांची व्यावसायिक जागा खरेदी केली आहे. बोरिवली रेल्वे स्टेशनसमोर विन्नी एलिगन्स येथे टायटनचे मोठे शोरुम उघडण्यात येणार आहे.
यासाठी १६,२८० चौरस फुट जागा विकत घेण्यात आली. या जागेत तीन मजली भव्य शोरूम उभारले जाईल. त्यात तळमजला, पहिला माळा व अप्पर बेसमेंट असेल. या जागेच्या कराराची नोंदणी गुरुवारी झाली असून यासाठी ६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. भरलेल्या १०० कोटींपैकी फक्त ३७.३२ लाख रुपये ॲक्सिस बँकेकडून कर्ज घेऊन भरले गेले.