लंडन –
लंडनच्या बोनहॅम इस्लामिक आणि इंडियन आर्ट सेलमध्ये टिपू सुलतानची तलवार १४५ कोटी रुपयांना विकली गेली. याआधी २००४ मध्ये फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने टिपू सुलतानची ही तलवार दीड कोटी रुपयांना खरेदी केली होती. तब्बल १९ वर्षांनंतर या तलवारीचा पुन्हा लिलाव करण्यात आला.
ही तलवार २००४ मध्ये विजय मल्ल्या यांनी खरेदी केल्याचे केली होती. २०१६ मध्ये लंडन उच्च न्यायालयाने विजय मल्ल्याची मालमत्ता गोठवण्याचे आदेश जारी केले होते. मल्ल्याने न्यायालयाला सांगितले होते की, ही तलवार आपल्या कुटुंबासाठी अपशकुनी ठरली होती, म्हणून ती परत केली होती.
या तलवारीला मोठे एतिहासिक महत्त्व आहे. मेजर जनरल बेयर्ड यांनी ४ मे १७९९ रोजी सेरिंगपटमवरील हल्ल्याच्या वेळी ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व केले होते. या लढाईत टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ब्रिटिश सैन्याने श्रीरंगपट्टणम ताब्यात घेतले होते. टिपूच्या शयनगृहात ही तलवार तेथे आढळून आली होती. त्यानंतर ही तलवार मेजर जनरल बेयर्ड यांच्याकडे सोपवण्यात आली.
टिपू सुलतानच्या तलवारीची १४५ कोटी रुपयांना विक्री
