तासगाव- टेंभू योजनेच्या पाण्यासाठी तालुक्यातील वायफळे गावातील ग्रामस्थ सोमवार १८ सप्टेंबरपासून उपोषण आणि तासगाव-भिवघाट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार असा निर्धारच वायफळे ग्रामस्थांनी केला आहे.
आतापर्यंत वायफळेसह आठ गावातील ग्रामस्थांना टेंभूच्या पाण्यासाठी राजकिय नेत्यांनी नुसतेच झुलवत ठेवले आहे.गेल्या ३५ वर्षांत या ग्रामस्थांना आश्वासनाशिवाय काही मिळालेले नाही.या योजनेपासून वंचित ठेवलेल्या आठ गावांमध्ये वायफळेसह यमगरवाडी,
सावळज,सिद्धेवाडी,दहीवडी,जरंडी,डोंगरसोनी आणि बिरणवाडी या गावांचा समावेश आहे.या आठही गावातील ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.यासंदर्भातील निवेदन या ग्रामस्थांनी तहसीलदार रवींद्र रांजणे यांना दिले आहे.या निवेदनावर वायफळेचे लोकनियुक्त सरपंच संतोष नलवडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.