टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात
चौघांचा जागीच मृत्यू, ११ जखमी

पुणे – पुणे अहमदनगर महामार्गावर देवदर्शन करून गावी परतणाऱ्या कुटुंबाच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर आहे. राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे अशी मृत्यूमुखींची नावे आहेत. हे सर्वजण शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवासी होते.

पुणे अहमदनगर कामरगाव येथे हा भीषण अपघात झाला. हे कुटुंब नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून ते गावी परत येत होते. एकूण १५ जण एका टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावरील कामगारगाव येथे आले असता पुण्याकडून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यात टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक टेम्पोवर आदळला. या जोरदार धडकेत टेम्पोमधल्या चौघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील जखमी ११ सदस्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.

Scroll to Top