टोमॅटोच्या दरात वाढ ५० रुपये किलो दर

मुंबई
कांदा आणि बटाट्यापाठोपाठ आता टोमॅटोच्याही दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. राज्यात गेल्या दोन-तीन आठवड्यांत टोमॅटोचे दर दुपटीने वाढले आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोचा दर ४० ते ५० रुपये किलो झाला आहे. मात्र, कडक उन्हामुळे वेगाने पिकणाऱ्या टोमॅटोचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने उत्तर भारतातील राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची सरासरी घाऊक किमत ३५ ते ५० रुपये प्रति किलो आहे, तर कर्नाटकातील काही बाजारपेठांमध्ये टोमॅटोंचा दर ६० रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top